शासनाकडुन अभियंत्यांच्या काम वाटपाच्या कोट्यात वाढ!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिल्या जाणाºया कामांच्या कोट्यात वाढ करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक झाली होती. या बैठकीनंतर काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना वाटप होणाºया कामांच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी मिळणाºया एक कोटीं रुपयांच्या कामांची मयार्दा तब्बल तीन कोटीपर्यंत करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अभियंता प्रदीप पडोळे यांनी दिली आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारअभियंत्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिल्या जाणाºया कामांच्या कोटात वाढ व्हावी तसेच जास्तीत जास्त कामे मिळावीत यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष प्रदीप पडोळे, महासचिव एम ए हकीम तसेच संपूर्ण पदाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे गत वर्षी पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ६ नोव्हेंबर २०२३ रोजी बांधकाम विभागातील अधिकाºयांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विभागाचे सचिव साळुंखे, इमारत विभागाचे सचिव दशपुते त्यावेळीप्रामुख्याने उपस्थित होते. सदर बैठकीत महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनच्या मागण्यांवर चर्चा करून सुशिक्षित बेरोजगार अभियंता जास्तीत जास्त कामे देण्याविषयी मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली होती. नेमक्या त्याच बैठकीचे इतिवृत्त ध्यानात घेऊन मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २८ फेब्रुवारी रोजी कामांच्या मर्यादा वाढीसंदर्भात शासन निर्णय परित केला आहे. त्या शासन निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना आता तीन कोटीपर्यंतची कामे विनास्पर्धा दिली जाणार आहेत. तसेच आपसातील स्पर्धेतून कामांची मयार्दा तीस लाखांवरून थेट ५० लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना कामांसाठी भरपूर वाव मिळणार असून हे असोसिएशनने केलेल्या प्रयत्नांचेच फलित असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *