चंदुबाबा देवस्थानात सार्वजनिक हरिनाम सप्ताह

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विश्वस्वरुप संतपुरुष चंदुजी महाराज,श्री चंदुबाबा देवस्थान कमेटी मोहाडीच्या वतीने संस्थापक ठूर्रीबाबा (गणपतदास महाराज व रामकृष्ण महाराज) यांचे मठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक हरिनाम सप्ताह आयोजित केले आहे. श्री चंदूबाबा देवस्थान कमेटीचे अध्यक्ष विश्वनाथ श्रीराम बारापात्रे, उपाध्यक्ष गणपतराव शामू खापेकर, सहसचिव हेमंत शामराव बावणे, कोषाध्यक्ष सुदर्शन राखडू आगाशे, कार्य सदस्य विजय मारोती शिंदेकर, सुखदेव वासुदेव आगाशे, केवळजी कांबळे, श्रीमती रेखाताई सुनिल पराते, जगन रामचंद शेंडे, दयाराम श्रीराम निखार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ६ वाजता झेंडा चढविण्यात आले. हवन कार्यक्रम होऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. सोमवार दि. ७ नोव्हेंबर २०२२ ला दुपारी १२ वाजता नदी तीरावर दहिकाला व नंतर महाप्रसाद होईल. रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ७.३० वाजता झेंडा कार्यक्रम पार पडले,

सकाळी ७.३० ते ९.३० वा.हवन,सकाळी १०ते १२ वाजता गणपतदास भजन मंडळ, मोहाडी (दिनेश बारापात्रे) दुपारी १२ ते २ वाजता दास भजन मंडळ, मोहाडी (जगदिश निखारे), दुपारी २ ते ४ वाजता, भजन दुपारी ४ ते ६ वाजता, भजन संध्या.६ते ८ वाजता भजन, रात्री ८ते १० वाजता, रात्री १० ते २ वाजता किर्तन, गुरुदेव सेवा भजन मंडळ, मुंढरी (लक्ष्मण निमजे), रात्री २ ते ४ वाजता, अखिल भारतीय संत समाज मंडळ दुर्गापूर (मानकरजी), पहाटे ४ ते ६ वाजता ठूर्री बाबा भजन मंडळ, सुरत (रमेश बारापात्रे ). सोमवार दि.७ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ६ ते ८ वाजता, दुर्गा चालीसा भजन मंडळ, मोहाडी (परसराम नंदनवार), सकाळी ८ ते १० वाजता, चंदुबाबा भजन मंडळ, कोरंभी (जगन शेंडे), सकाळी ९ वाजता प्रभात फेरी, सकाळी १०ते १२ वाजता, गुरुदेव सेवा भजन मंडळ, मोहाडी (तुळशिराम निपाने). सुरत येथील मारोती निमजे यांच्याकडून महाप्रसाद वितरित करण्यात येईल. सोमवार दि.७ नोव्हेंबर २०२२ ला आमसभा व कार्यकारणीच्या रिक्त पदाकरता आमसभा घेण्यात येईल. असे श्री चंदूबाबा देवस्थान कमेटीचे अध्यक्ष विश्वनाथ श्रीराम बारापात्रे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *