भंडारा-गोंदियाच्या विकासासाठी सुनील मेंढे यांना आशीर्वाद द्या – पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय जनता पक्ष व महायुतीचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी भंडारा तालुक्यातील महादुरा व अनेक गावात प्रफुल पटेल यांनी प्रचार सभा पार पडली. “केंद्रात नरेंद्र मोदींच सरकार येणं ही भारतीय जनता पक्ष व महायुतीसाठी महत्त्वाचे नसून सर्वसामान्य जनतेकरिता अत्यंत आवश्यक” असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी केले. भंडारा तालुक्यातील मोहदुरा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना प्रफुल पटेल बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांचे नेतृत्वचं सक्षम असून त्यांच्या पत्नी सुद्धा समाज समर्पित असल्याचे प्रफुल पटेल म्हणाल्या. मागील दहा वर्षात मोदी सरकारने कार्यान्वित केलेल्या मुद्रालोन, आवास योजना, जलजीवन मिशन, जनधन खात्यांच्या माध्यमातून थेट पैसा सर्वसामान्यांना मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला गठबंधन हा विकासाच्या मुद्यावर केलेला आहे. परंतू फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा कदापीही सोडलेली नाही. भंडारा गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या विकासासाठी आपण महायुतीचे उमेदवार श्री सुनील मेंढे याना आशीर्वाद द्या असे पटेल बोलले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.