भ्रष्ट कारभाराविरोधात आरटीओ कार्यालयावर हल्लाबोल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जय जवान जय किसान भंडारा संघटनेचे अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात आज दि.२१ डिसेंबर रोजी विवीध मागण्यांसाठी भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. भंडारा जिल्हात व शहरात अवजड वाहने ही ओव्हर लोड चालत असल्यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. भंडारा शहरातुन मॅग्निज ,रेती, गिट्टी, कोळसा मुरूम व इतर ट्रान्सपोर्ट करणारे वाहने ही ओव्हर लोड धावतात मात्र त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो तर गरीब व सामान्य जनतेला नियमांचा धाक दाखवुन त्यांच्यावर कारवाई केली जाते. ही एकप्रकारची परिवहन विभागाची लुटमार आहे. भंडारा शहरात आरटीओ विभागाचे अधिकारी हे लहान व्यवसायीकांचे वाहनानवर कारवाई करीत त्यांच्याकडुन दंड वसुल करतात. मात्र रस्त्यावरून नियमांचा सर्रासपणे भंग करणारे ट्रक ,ट्रॅक्टर, ट्रॅव्हल्स , टिप्पर यांच्याकडुन ‘एन्ट्री’ च्या नावाखाली आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना वाट मोकळी करून दिली जाते.हा सगळा व्यवहार दलालांमार्फत केला जातो.

करीता अशा वसुलेबाज आरटीओ विभागाच्या अधिकाºयांना निलंबीत करण्यात यावे व जिल्ह्यात नियम मोडुन धावणाºया वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सचिन घनमारे ,वाहन चालक मालक जिल्हाअध्यक्ष मनिष सोनकुसरे,शहर अध्यक्ष सचिन बागडे,मोहाडी तालुका अध्यक्ष सुगत शेन्डे,खोकरला ग्रामपंचायत सदस्य कमलेश मेंढे,केसलवाडा ग्रामपंचायत सदस्य राकेश आकरे,बांधकाम अध्यक्ष किशोर पंचभाई,महिला शहर अध्यक्ष भारती लिमजे ,नंदकिशोर नागोसे ,राकेश आग्रे, राहुल भोगांडे, पाचे, प्रविण बोरघरे,अब्रार खान ,मंदा येनोरकर, उषा केझरकर, संजना साकुरे, मंदा ठाकरे, राजेंन्द्र वाघमारे, नितेश चाचेरे,रितिक वासनिक ,शुभम रामटेके ,साल्लर, कैलास कांबळे, श्रीधर आकरे व नागरीक उपस्थीत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.