जंगलात आढळले पाच मोर मृतावस्थेत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी विसापूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रात वर्षभरापूर्वी जंगल सफारी सुरु केली. वन्यप्राण्याचे दर्शन व्हावे म्हणून पर्यटक येतात. याच जंगल सफारी परिसरात कारवा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५०० मध्ये ५ मोर पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने बल्लारपूर वन परिक्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. बल्लारशाह वन विभागात चांगले जंगल आहे. या वन परिक्षेत्रातील कारवा गाव जंगलाने वेढले आहे. यामुळे या परिसरात वन्य प्राणी व पशु पक्षी मोठ्या प्रमाण्ाांत आहे. बल्लारशाह वन विभागाने याच कारणास्तव कारवा जंगल सफारी सुरु केली. काही प्रमाणात वन पर्यटकदेखील वाढले आहे. मात्र याच भागात पाच मोर पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने वन विभागातील अधिकारी व कर्मचारी विचारात पडले आहे. ही घटना १३ डिसेंबर दरम्यान वन विभागाचे कर्मचारी गस्त करीत असताना उघडकीस आली.

बल्लारशाह वन विभागाच्या अधिकाºयांनी पाच ही मोर पक्षांना ताब्यात घेऊन उतरीय तपासणीसाठी वन्य जीव उपचार केंद्र येथे पाठविण्यात आले आहे. मोर पक्षांचा उतरीय तपासणीचा रासायनिक विश्लेषक जिल्हा न्याय सहायक, वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर येथून अहवाल प्राप्त झाल्यावर मोर पक्षाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, असे सांगता येईल. एकाच वेळी पाच मोर पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने कारवा जंगलातील जलाशयाचे पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, तपासणी केली जात आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केल्याची माहिती बल्लारशाह वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली. त्याचप्रमाणे १४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्डात नीलगाईचे पाडस आले. त्या पाडसावर कुत्र्याने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *