जितद आव्हाडावर कठोर कारवाइ करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : हिंदूंचे आराध्य असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करणाºया धर्मद्रोही जितेंद्र आव्हाड याचा आज विश्व हिंदू परिषद व हनुमान जन्मोत्सव समिती भंडारा तर्फे जाहिर निषेध करण्यात आला. याविषयी आपल्या वक्तव्याबाबत आव्हाड यांनी समस्त हिंदूंची जाहिर माफी मागावी व पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. सध्या अयोध्या येथे श्रीराम मंदिर पुर्णत्वास असून येथे प्रभू श्रीरामांच्या मुतीर्ची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याने संपुर्ण देशात रामनामाचा जागार सुरू आहे. यामुळे सर्व जातीधमार्चे लोक एकत्रित येवून रामभक्तीत मग्न होत असताना ही एकता काही लोकांच्या नजरेत खटकत असल्याने त्यांच्याकडून विचित्र वक्तव्य करीत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नुकतेच जितेंद्र आव्हाड नामक व्यक्तीने प्रभू श्रीरामांबद्दल आपत्तीजनक वक्तव्य करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद व हनुमान जन्मोत्सव समिती भंडारा तर्फे आज भंडारा येथे जितेंद्र आव्हाड याचा तीव्र निषेध करण्यात आला. बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना दुखावून समाजातील शांतता भंग होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणा-या जितेंद्र आव्हाड या व्यक्तीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याविषयी पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हनुमान जन्मोत्सव समिती अध्यक्ष मयूर बिसेन, प्रकाश पांडे, विकास मदनकर, मंगेश वंजारी, सचिन कुंभलकर, नितिन धकाते, ओजल शरणागत, रोशन काटेखाये, पुरुषोत्तम वैद्य, प्रशांत निंबोलकर, नितीन जरकारिया, पियूष घई, माला बगमारे, अर्चना श्रीवास्तव, सुरेश कुंभलकर, लवकुमार सिंग, सत्यम बुंदेला, आकाश मोहबे व अन्य नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *