गोंदियात जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्या बद्दल जे १४ वर्ष वनवास केला तेव्हा त्यांनी मांसाहार केला असल्या बद्दल विधान केले, त्या विधानाचे पडसाद आज गोंदिया जिल्ह्यात सुद्धा पाहाव्यास मिळाले. गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट यांनी या गोंदिया शहरातील बालाघाट टी पॉइंट वरून मोर्चा काढत अवंतीबाई चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळा चित्रास जोडे चपल चा हार घालून जोडामार आंदोलन करून पुतळ्याचा दहन करून आपला निषेध नोंदविला. त्यामुळे बालाघाट तीरोडा मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आणि जो कोणी हिंदू धर्माबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करेल त्याच्या शिवसेने द्वारा निषेध करण्यात येईल असेही शिवसेना शिंदेगट यांनी सांगितले. तर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलीस तक्रारी करण्यात यावी असे मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे.

या वेळी मुकेश शिवहरे (शिवसेना जिल्हाप्रमुख), जितेंद्र बावनकर (शिवसेना जिल्हा उपप्रमुख), गोलु डोहरे (शिवसेना जिल्हा उपप्रमुख), बापी लांजेवार (शिवसेना शहर प्रमुख) कुलदीप रिनायत (शिवसेना तालुका प्रमुख), अभिमन्यु चत्रे (शहर संघटक), सुधीर दिवेदी (विधानसभा संघटक), मनोज लिल्हारे (विधानसभा प्रमुख), पंकज सावंत (शहर उपप्रमुख), आशीष चौहान (तालुका उपप्रमुख), भरत साहू,आवेश चतरे,गुड्डू चौरसिया, टोकेश हरिणखेडे, संदीप आसेटकर सुनील शेंगर बंटी ठाकरे, गुड्डू राणे, दीपक साहरे, धनेंद्र पारधी, सुनील साहारे,महेश बिसेन, पुरुषोत्तम रावते मनोज सोनवणे, पंकज अग्रहरी,राकेश मदनकर, हिमांशू दुबे सौरभ धोमणे, मुकेश तांडेकर, माण्या सोनवणे, अक्षय सोनवणे ,बंटी ठाकरे, विजय रजाक, निखिल मेश्राम आणि शिवसैनिक सामील होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *