आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांसोबत!

प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता दोन गट निर्माण झाले आहे. एक गट खा. शरद पवार यांचे समर्थन करणारा तर दुसरा गट ना. अजित पवार यांना समर्थन करणारा आहे. खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासोबत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हेचआता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीड हजारांवर सक्रिय सदस्य शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यासह असल्याचे शपथपत्र शुक्रवारी (दि.७) लिहून देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २ जुलैला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत नऊ जणांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह खा. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेते व आमदारांनीसुद्धा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत त्यांच्यासह गेले. दरम्यान, या सर्व प्रकारावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

दरम्यान, पक्षात वर्चस्व कोणाचे व कोणाच्या बाजूने किती नेते, कार्यकर्ते आहेत हे दाखविण्यासाठी खा. शरद पवार आणि ना. अजित पवार यांच्यात आता ह्यकिस मे कितना है दमह्ण चा संघर्ष सुरू झाला प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता दोन गट निर्माण झाले आहे. एक गट खा. शरद पवार यांचे समर्थन करणारा तर दुसरा गट ना. अजित पवार यांना समर्थन करणारा आहे. खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासोबत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हेच आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत राष्ट्रवादीकाँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, कार्यकर्ते एकसंघपणे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत. जिल्ह्यातून अद्यापही एकही पदाधिकारी व सदस्यांने आपले समर्थन खा. शरद पवार यांना असल्याचे जाहीरपणे पुढे येऊन सांगितले नाही. एवढेच तर आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीड हजारांवर सक्रिय सदस्य शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह असल्याचे शपथपत्र लिहून देणार आहेत.

प्रमुख पदाधिका-यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व शहरध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, प्रमुख नेते मुंबईहून गुरुवारी गोंदियाला परतले. त्यानंतर आता शुक्रवारी (दि.७) या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सकाळी ११ वाजता रेलटोली बोलविली आहे. या बैठकीत हे शपथपत्र भरून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी सांगितले.

आता मोर्चेबांधणीवर भर

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, नेत्यांनी आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोचेर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवारपासून या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.

आमचा निर्णय पक्का, प्रफुल्ल पटेलांनाच शिक्का

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला आहे. आमचा निर्णय पक्का झाला असून आपला प्रफुल्ल पटेलानांच येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक शिक्का असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *