पं.स. सभापतीने ठोकले बीडीओच्या कक्षाला कुलूप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितसिंह पवार यांच्या मनमानी कारभार व सततच्या सुट्टीमुळे कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. याच्या विरोधात पंस सभापती मनोज बोपचे यांनी आज, २६ जुलै गटविकास अधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितसिंह पवार यांच्या मनमानी कारभारामुळे पंचायत समितीचा कारभारात खिळ निर्माण होत असून पदाधिकाºयांमध्ये रोष व्यक्त होत आहे. गटविकास अधिकारी पवार हे मागील सहा महिन्यापासून अधूनमधून गैरहजर राहत असून वरिष्ठ अधिकाºयांनाही याची माहिती देत नाहीत. शुक्रवारपासून ते गैरहजर आहेत. त्यांचा भ्रमणध्वनीही बंद आहे. पंस पदाधिकारी व कर्मचाºयांशी समन्वय नाही. परिणामी अनेक कामे ठप्प आहेत. मग्रारोहयो व १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या विविध कामांचे देयके प्रलंबित असल्याने पदाधिकाºयांना लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सोमवारपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने आज, २६ जुलै रोजी सभापती मनोज बोपचे यांनी पंचायत समिती सदस्यांसह त्यांच्या कक्षाला कुलूप ठोकले. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याठी त्यांच्या भम्रणध्वनीवर संपर्क केल्यावर त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता. पंचायत समितीच्या ढर माध्यमातून विविध लोकोपयोगी कामे करण्यात येतात. तालुक्यात या कामांची कोट्यावधीची देयके रखडली आहेत. गटविकास अधिकाºयांच्या सततच्या गैरहजरीमुळे विकास कामे प्रभावित झाली आहेत. त्याचा पदाधिकारी व कर्मचाºयांशी समन्वय नाही. त्यांनी काही पदाधिकारी व कर्मचाºयांचे भ्रमणध्वनी क्रमांक ब्लॉक केले आहेत. वरिष्ठांना न सांगताच ते रजेवर जातात. परिणामी अनेक कामे प्रभावित झाली असल्याने त्यांच्या कक्षाला कुलूप ठोकल्याचे पंस सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *