संविधानिक मार्गाने हक्क आणि अधिकारासाठी लढा उभारण्याची आवश्यकता – माजी न्या. रहाटे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील जिल्हा परिषद चौक लगतच्या संत शिवराम महाराज विद्यालयात आयोजित काही संघटनाच्या शिष्ट मंडळाच्या सभेत बोलतांना मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भगवान रहाटे यांनी सांगितले की, सध्या राजकारणातील अनैतिकता, व धार्मिक विषमतावादी चिंगारी, लोकशाहीला घातक असून ते सर्व सामान्य जनतेला त्यांच्या संविधानिक मौलिक आधिकार व हक्क या विषयी माहिती नसल्यामुळे न्यायीक लढाई साठी सामाजिक जागरूकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय मानवाधिकार संघटन नवीदिल्ली या संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी म्हणाले की, वर्तमान काळातील आपला बहुसंख्य सुशिक्षित वर्ग फक्त स्वत:ची पोळी शेकण्यात व्यस्त आहे. त्यांना समाजातील सामान्य सोशीत पिडीत जनतेची पर्वा नसल्यागत वागत आहेत जसे पक्षातील राजकारणी मोठे झाल्यानंतर पक्ष बदलून ज्या जनतेने आपल्या पक्षावर विश्वास ठेऊन लढून भांडून आपल्यालासत्तेची खुर्ची दिली त्या जनतेला खुर्ची साठी विसरणे सामान्य बाब झाली आहे आपल्याला आपल्या मौलिक अधिकाराचे विसर पडत असल्याचे मत व्यक्त केले.

अतिथी म्हणून बोलतांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी लोकशाही टिकविण्यासाठी आता सर्वांनी वैचारीक दृष्टीकोनाने प्रचार प्रसार करण्याचे आवाहन केले. प्रसंगी प्रा. शेखर बोरकर सरचिटणीस विदर्भ, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांचा ५० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश भगवान रहाटे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मानवाधीकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ.देवानंद नंदगवळी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे हे होते तर विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर भंडारा जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, सह सचिव गंगाधर भदाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पडोळे महाराष्ट्र तैलिक महासंघाचे जिल्हा सचिव प्रवीण भोंदे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा साचिव जयेंद्र देशपांडे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राजु निंबार्ते, जागेश बांते आदी अतिथी गण उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन प्रविण भोंदे यांनी केले तर सैनपाल वासानिक यांनी सर्वांचे आभार मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *