भंडाºयात धारदार शस्त्राने युवकाची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील अतिशय गजबजलेल्या गांधी चौक येथे अमन धिरज नंदुरकर नामक २३ वर्षीय युवकाची रविवारी रात्री १०.१५ वाजताच्या दरम्यान धारदार चाकुने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने आरोपींपैकी एक असलेल्या अभिषेक साठवणे वय १८ या युवकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून अमनच्या हत्येत रा.आंबेडकर वार्ड भंडारा यांना तात्काळ अटक केली असुन यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.

गांधी चौक येथे मृतक अमन धिरज नंदुरकर याचे काका किरण नंदुरकर यांची दुर्गा लस्सी सेन्टर या नावाने व्यवसाय असुन दिनांक २७ मे २०२३ रोजी आंबेडकर वार्ड भंडारा येथे राहणारा विक्की सिध्दार्थ मोगरे व मृतकचा काका किरण नंदुरकर यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्या भांडणाचे सेटलमेंन्ट करण्याकरीता दि.२८ मे रोजी रात्री च्या दरम्यान विक्रम सिंध्दार्थ मोगरे, विष्णु ऊर्फ बा वासनिक , साहिल सहभागी असलेले साहिल गजानन मालाधरे,अतुल तांडेकर,निशांत रामटेके गजानन मालाधरे , अतुल तांडेकर , निशांत रामटेके व अभिषेक साठवणे सर्व रा.आंबेडकर वार्ड व त्यांचे सोबत ईतर सहकारी हे गांधी चौक भंडारा येथे आले व मृतक अमन नंदुरकर याचे काका किरण नंदुरकर यांचे सोबत बोलणी सुरू असतांनाच वाद किरण नंदुरकर यांचे सोबत भांडण करीत असल्याचे पाहुन तीथे उपस्थित असलेला मृतक अमन नंदुरकर हा मध्यस्थी करण्याकरीता गेला असता या भांडणातच विकोप्याला जाऊन भांडणाचे रुपांतर हाणमारीत झाले.

आरोपी हे मृतकाचे काका अभिषेकने आपल्या जवळील चाकू काढला आणि अमनच्या पोटातच भोसकला. यामुळेतो रक्तबंबाळ होऊन पडला. ही घटना घडल्यावर अमनचे काका, वडील, मित्रांनी आणि परिसरातील अन्य नागरिकांनी धाव घेतली आणि अभिषेकला पकडले. या दरम्यान काहींनी अभिषेकला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नागरिकांनी आणि नातेवाईकांनी जखमी अमनला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळे अभिषेकलाही रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. अमनच्या मृत्यूची बातमी कळताच, जमावाने रुग्णालयातच अभिषेकला पुन्हा लाथाबुक्क्यांनी बदडुन काढले. यामुळे तो गंभीर जखमी झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आले.

मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलीसांनी परस्परा- पोलीसांनी तपासाचे चक्रे द्रुत गतीने फीरवुन गोपनिय माहीता व तांत्रीक पुराव्याचे आधारे गुन्हयातील आरोपी साहिल गजानन मालाधरे,अतुल तांडेकर व निशांत रामटेके सर्व रा. आंबेडकर वार्ड भंडारा यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , सहा. पोलीस अधीक्षक साकोली अति. कार्यभार उपविभाग भंडारा सुशांत सिंह यांचे मार्गदर्शनात भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांचे नेतृत्वात स.पो. नि विनोद गिरी , पो.उप.नि मंगेश क-हाडे, पो.उप.नि गणेश पदवाड, पो.उप.नि रहाटे, पो.हवा प्रशांत भोंगाडे, पो.हवा साजन वाघमारे, पो.हवा बालाराम वरखडे, पो.ना सुनिल राठोड, पो. शि नरेंन्द्र झलके, पो.शि लांडगे यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि विरोधात गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता भंडारा विनोद गिरी व पो.उप.नि निखिल रहाटे हे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *