एसटी महामंडळाच्या चालक-वाहक पदभरती संदर्भात आज मुंबईत बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एस.टी. महामंडळ, भंडारा विभाग अंतर्गत वर्ष २०१९ मध्ये झालेली चालक तथा वाहक पद सरळ सेवा भरती मध्ये ४०७ ची जाहिरात काढण्यात आलेली होती. त्यामध्ये ३३० उमेदवार पात्र ठरलेले असुन २३२ उमेदवारांना निवळ यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेले आहे. उर्वरित ४८ उमेदवार हे प्रतिक्षा यादी मध्ये असुन ५० उमेदवार हे निवळ यादीमध्ये आहे. त्यामुळे एकुण ९८ उमेदवारांवर अन्याय झालेला असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

या विषयावर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रधान सचिव (परिवहन) यांना पत्र पाठवून तात्काळ बैठक आयोजित करून उर्वरित ९८ उमेदवारांवर झालेल्या अन्याय दुरू करण्याकरीता विनंती केली होती. माजी मंत्री डॉ. फुके यांच्या पत्रावर गंभीर दखल घेत एसटी महामंडळाच्या प्रधान सचिव (परिवहन), यांनी उद्या ३० मे रोजी डॉ. परिणय फुके यांची उपस्थिति मध्ये मुंबई मंत्रालय मध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत एसटी महामंडळाच्या चालक-वाहक पद भरतीमध्ये उर्वरित ९८ उमेदवारांवर झालेला अन्याय” या विषयावर सकारात्मक चर्चा होईल आणि अन्याय दूर होणार असा विश्वास डॉ. फुकेनी व्यक्त केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *