अड्याळ येथील घोडायात्रेला आज रामनवमीपासून सुरूवात

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अड्याळ येथील घोडायात्रेला बुधवार, दि. १७ एप्रिल ला सायंकाळ चैत्र शुद्ध अष्टमीला कलश विसर्जन तसेच संगीतमय श्रीमद भागवत कथेला सुरूवात होणार असल्याची माहिती हेमंत श्रृंगारपवार यांनी दिली. १७ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव तथा श्री बालाजी रथयात्रा निघणार आहे. या यात्रेत सर्वधर्मीय बांधव सहभागी होतात. तसेच २३ एप्रिल रोजी पहाटे स्वयंभू हनुमंत देवस्थानात हनुमंत जन्मोत्सव, गोपाळकाला, सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळा, महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. दि. १६ ते २३ एप्रिलदरम्यान हनुमंत देवस्थान पंच कमिटीतथा श्री ग्रामविकास एकात्मता भागवत समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यानिमित्ताने अड्याळ नगरीत एकच गर्दी उसळणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.