दहेगाव परिसरातील बेरोजगारांची शहराकडे भटकंती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी परिसरातील झरी तलाव सिंचन सुविधा व दहेगाव माईन्स येथील खाण, हे दोन्ही प्रकल्प मागील कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेले असून याकडे जनप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. झरी प्रकल्प सुरु झाल्यास वीस गावातील शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची सोय होऊन शेतकरी सुजलाम व सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही, तर दुसरीकडे दहेगाव माईन्स येथील बंद पडलेली खाण सुरु झाल्यास शेकडो युवक कामगारांच्या हाताला काम मिळेल व बेरोजगाराची ईतर शहराकडे चाललेली भटकंती थांबेल. पण परिसरात साधन व संपत्ती असतांना सुद्धा जनप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने हा परिसर विकासापासून कोसो दूर असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पारडी परिसर जंगल व्याप्त असून या जंगलात विविध प्रकारच्या वनपयोगी औषधियुक्त झाडे आहेत, त्यावर आधारित उद्योग सुरु केल्यास अनेक बेरोजगाराची हातात काम मिळेल, पण तसे होताना दिसून येत नाही.

जर उद्योगधंदे मागणीसाठी आंदोलन, उपोषण करावे लागत असेल तर जणप्रतिनिधीचा काय उपयोग, असा खोचक टोलाही यावेळी लावला गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित माईंन्स तथा झरी तलावाच्या कामासबंधाने गट्टाभर मागणीपत्र मंत्रालयापासून ते संबंधीत सर्वच विभागाला पोहचते केले आणि अजूनही आमचा संघर्ष हा सूरूच आहे मात्र अद्याप कसलाही या कामासबंधाने या क्षेत्रातील जनप्रतिनिधी यांनी शुद्धा पाठपुरवठा केला नसून आजही या परिसरातील बेरोजगार रोजगाराअभावी ईतरत्र भटकंती करतानाचे विदारक चित्र बघावल्या जात नाही यामुळे यापुढे या क्षेत्रातील शेकडो बेरोजगारासमवेत संपूर्ण तालुकाभर तिब्र आंदोलन छेडण्याचा इशारा मानबिंदू दहिवले यांनी दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.