संघटन हे हक्क, अधिकार, न्याय मिळवण्याचे साधन- आ.विक्रम काळे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पांढराबोडी : महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी पदाधिकारी, सदस्यांनी कोणत्याही प्रकारचे मतभेद न ठेवता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या न्यायोचित मागण्या मान्य करण्यासाठी तसेच अन्याय, समस्याग्रस्त कर्मचाºयांवर होत असलेल्या अन्याया विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारून अन्याय, समस्याग्रस्त कर्मचाºयांना संविधान दत्त हक्क, अधिकार, न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या धेय्य धोरणाला सर्व निष्ठावान, प्रामाणिक स्वाभिमानी सक्रिय पदाधिकारी व सदस्यांनी बांधील असले पाहिजे तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघाची सम्यक तत्वप्रणाली, विचार सरणी अनुसरून, ती आचरणात आणून संघटनेची विचारधारा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांपर्यंत पोहोचवावी तसेच समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या समस्या नि:स्वार्थ पणे सोडविण्याची जबाबदारी पदाधिकाºयांनी आपल्या शिरावर घेतली पाहिजे कारण संघटना हे स्वार्थ साधण्याचे साधन नाही तर ते संविधान दत्त हक्क,अधिकार, न्याय मिळवण्याचे साधन आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे सरसेनापती तथा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे लढवय्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी १२डिसेंबर रोजी नागपूर येथील राष्ट्रवादी शिक्षक पदाधिकारी बैठक कार्यक्रम प्रसंगी केले.

उपराजधानी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी शिक्षक संघ नागपूर तसेच अमरावती विभाग स्तरीय पदाधिकारी सहविचार समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, शासनाने जुनी पेन्शन पूर्ववत लागू करावी यासाठी यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करून ध्यानाकर्षण केले आणि शासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी प्रसंगी श्वेतपत्रिका काढावी असा मी स्वत: आग्रह धरला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारून योग्य वेळ येताच जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आश्र्वस्त केले आहे. विना अनुदानित शाळांना अनुदान देणे,अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढीसाठी विद्यार्थी पटसंख्या अट शिथिल करून टप्पा अनुदानात वाढ करणे, शाळा सुरू करण्यास शासन मान्यता मिळालेल्या शाळांना पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर त्या शाळांना कायमस्वरूपी शिक्षण मंडळ मान्यता देण्यात यावी, कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे सर्व प्रकारचे प्रलंबित देयके निकाली काढण्यात यावी या समकक्ष अन्य विषयांवर सांगोपांग चर्चा करून समाधान करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजी नगर मराठवाडा औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे लढवय्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष खेम राज कोंडे, नागपूर विभाग अध्यक्ष चंद्रभान सातघरे, कार्याध्यक्ष देवेंद्र सोनटक्के, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष रियाझ भाई काझी, महिला संघ आघाडी अध्यक्षा डॉ.स्मिता नाहातकर, सचिव ओमप्रकाश धाबेकर, अमरावती विभाग अध्यक्ष विक्रम गावंडे, रवींद्र हीवरकर, अशोक काणेकर, गिरिधारी चौहान, सतीश अवतारे, निलेश ढोरे तसेच इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *