आ. भोंडेकर यांची पुरग्रस्तांना भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात आणि लगतच्या राज्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे पुर परिस्थिति निर्माण झालेली आहे. भंडारा विधान सभेचे आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज पुर ग्रस्त परिवारांची भेट घेतली आणि शासन तर्फे हवी ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सोबतच ज्यांचे पुनर्वसन झाले नाही त्यांच्या करीत विशेष बाब म्हणून शासन दरबारी तगादा लावून विशेष मदत अंतर्गत पुनर्वसन साठी निधी मिळवून देण्याचे वचन दिले. भंडारा विधानसभेचे भंडारा आणि पवनी हे दोन्ही तालुक्यातील अनेक गावे वैन गंगानदी च्या तीरावर बसलेले आहेत. अतिवृष्टी मुळे वैनगंगेला येणा?्या पुराचा तडाखा या गावांना बसतो. या पुरामुळे भंडारा शहर लगतचे क्षेत्र जसे ग्राम सेवक कॉलॉनी, गणेशपूर, करधा हे सुद्धा जलमग्न होतात. गेली दोन दिवस झाली जिल्ह्यात पावसाने तगादा लावला असून लगतच्या मध्यप्रदेश चे ही धरण तुडुंब भरले आहेत. अश्यात या धारणांची दारे उघडल्याने भंडारा जिल्ह्याला याची झड पोचली आहे. भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावे पुराने वेढली गेली आहे. या गावांमधील पुर ग्रस्तांना भेटण्या करीता आम. नरेंद्र भोंडेकर हे आज स्वत: गावं पर्यन्त पोहोचले.

भंडारा तालुक्यातील गणेशपूर, ग्राम सेवक कॉलॉनी व करधा येथे त्यांनी भेट दिली. गणेशपूर क्षेत्रातील सहा परिवारांना हलवून येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या राहायची व्यवस्था करण्यात आली आहे. जेथे आम. भोंडेकर यांनी भेट दिली आणि परिवारांची विचारपूस केली. ज्या नंतर आम. भोंडेकर यांनी पवनी तालुक्यातील कुर्झा, इटगाव, जुनोना, शिवनाळा, वलनी, पवना खुर्द, मांगली, ईसापूर, उमरी, कोदुर्ली, रेवणी, भोजापूर, गुडेगाव या पुर ग्रस्त गावांची पाहणी केली. या दरम्यान पूर ग्रस्त नागरिकांनी आम. भोंडेकर यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. आम. भोंडेकर यांनी पुरग्रस्त परिवारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ज्यांचे पुनर्वसन गोसे बाधित म्हणून होऊ शकले नाही त्यांना शासनच्या विशेष बाब अंतर्गत पुनर्वसन करून देणे आणि आर्थिक मदत मिळवून देण्या बद्दल आश्वस्त केले. या सोबतच ज्या शेतकºयांच्या शेतात पुराचे पाणी गेले आहे आणि शेत पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दौरेत त्यांच्या सोबत शिव सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर अध्यक्ष मनोज साकोरे, विभागीय अधिकारी बालपांडे, भंडारा चे तहसीलदार विनीता लांजेवर, पवनी तहसीलदार महेंद्र सोनोने व अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *