काँग्रेसची सत्ता आली तर कर्मचाºयांना जुनी पेन्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पुढच्या काळात भंडारा जिल्हा ओलिताखाली शेती आणायची आहे. आमची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. तसेच काँग्रेसची सत्ता आल्यास कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करू. शिक्षण हे उत्थानाचे मार्ग आहे. पण, सरकार जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला निघाली आहे. गरीब वडील रक्ताचे पाणी करून मुलांना शिकवतो. पण विद्यार्थ्यांना पालकांचे स्वप्न सरकार धुळीत मिळवत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय आंधळगाव येथे ५१ वा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आला. बक्षीस वितरण व समारोप सोहळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश पारधी होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, महिला बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल मलेवार, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र इलमे, आंधळगाव ग्रामपंचायतचे सरपंच महेश गभने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालचंद पाटील, पंचायत समिती सदस्य दुर्गा बुराडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, प्राचार्य शरद सतदेवे, भरत खंडाईत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश हटवार, श्रीकांत येरपुडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी आमदार नाना पटोले,आमदार सुधाकर अडबाले,आमदार अभिजीत वंजारी, शिक्षण सभापती रमेश पारधी यांच्या सत्कार शाल श्रीफळ व ग्रामगीता देऊन करण्यात आला. पुढे बोलताना, आमदार नाना पटोले पुढे म्हणाले, बॅनर लावण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणाला मदत करा. व्यापारी राजकारण सोडा. लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एक व्हा असे आवाहन पटोले यांनी केले. आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात परिश्रम घेतले पाहिजे. शाळा भांडवलदारांच्या हातात देण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी तयार व्हा असे आवाहन केले. आमदार अभिजीत वंजारी म्हणाले, अनेक शाळांत भौतिक सुविधांची कमतरता आहे. शासन शिक्षक भरती संबंधात आपले शब्द पाळत नाही. उद्याचे भविष्य असणाºया विद्यार्थ्यांसाठी आम्हीलढतच राहू असे म्हणाले. यावेळी आचल बुराडे या विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण सभापती रमेश पारधी व बालचंद पाटील यांनीही संबोधित केले. बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन टिंगणे व शारदा चौधरी यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास राधेश्याम धोटे, दीपक कडव, प्रमोद सेलोकर, पृथ्वीराज जांभुळकर, जिल्हा परिषद आंधळगावचे शिक्षक विद्यार्थी यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *