पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौºयावर

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौºयावर येत आहेत. त्यांचे नाशिक येथे १२.१५ वाजताच्या सुमाराला आगमन होणार असून, २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबईत दाखल होतील. नरेंद्र मोदी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूचे लोकार्पण करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी ४:१५ च्या सुमारास मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून ह्यसुलभ गतिशीलतेला’ चालना देणे, हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून, त्याचे नाव अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. अटल सेतू एकूण १७,८४० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. २१.८ किमी लांबीचा सहापदरी हा पूल असून, तो भारतातील सर्वांत लांब पूल आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *