आता दहावीचा इंग्रजी पेपर होणार सोपा?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत लँग्वेज स्टडी (भाषा अभ्यास) या विषयात पासिंग व स्कोअरिंगच्या समान संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आहेत. दहावी इंग्रजीत भाषा विषयाची काठिण्य पातळी अधिक असल्याने पूर्वी विद्यार्थ्यांना या विषयाबद्दल भीती अधिक वाटायची. विद्यार्थ्यांना केवळ क्रमिक अभ्यासासोबत इंग्रजी स्वत: उपयोगात आणण्याच्या दृष्टीने केलेली प्रश्नपत्रिकेची रचना अधिक उपयुक्तता निश्चित करणारी आहे. एकूण ८० गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. पहिला प्रश्न हा लँग्वेज स्टडीचा आहे. हा प्रश्न दहा गुणांचा आहे. यामध्ये मिसिंग लेटर्स भरून शब्द पूर्ण करणे, अल्फाबे-ि टकली आॅर्डर, वर्डचैन, रिलेटेड वर्डस्मध्ये मुलांना उत्तरे द्यायची आहेत. हा वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर वाक्प्रचाराचा उपयोग करून वाक्य बनवा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. दुसºया प्रश्नात देखील पॅसेजवर आधारित प्रश्न असेल. या प्रश्नासाठी दहा गुण असणार आहेत. दिलेल्या पॅसेजवरील प्रश्नांची उत्तरे देता यावीत. त्यामध्ये पॅसेजवर आधारित अगदी सोपे पाच प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक ‘तीन ए’ मध्ये पुस्तकातील एक पोएम असेल. त्यासाठी पाच गुण आहेत. प्रश्न क्रमांक ‘तीन बी’ मध्ये पुस्तकातील पोएम असेल. कवितेचे नाव, कवितेचे कवी, रायमिंग स्मिम यावर आधारित प्रश्न तसेच कवितेची थीमविचारणारा प्रश्न असेल.
फिगर आॅफ स्पीचची तयारी अलिट्रेशन, मेटारर, सीमिली, रीपिटेशन यापैकी एखादा फिगर आॅफ स्पीच जमले तर ते सोपे होईल. प्रश्न क्रमांक एक ते तीन हे अगदी पासिंगसाठी उपयुक्त आहेत. चौथा प्रश्न अनसीन पॅसेजवर असेल. त्याला १५ गुण असतील. हा प्रश्न स्कोअरिंग करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना अत्यंतउपयुक्त ठरेल. या दहा गुणांच्या पॅसेजवर आधारित प्रश्न व पाच गुणांची समरी रायटिंगचा एक प्रश्न असेल. स्वत:च्या शब्दात उत्तर सोडवावे लागेल. पाचवा प्रश्न लेटर रायटिंगचा असेल. त्यामध्ये फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र व इनफॉर्मल लेटर असे दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यातील बी प्रश्न हा पॅरा रायटिंगसारखा असेल.पाचवा प्रश्न हा पाच गुणांचा असेल. प्रश्न क्रमांक ‘पाच ए’ मध्ये स्कोअरिंगची संधी आहे. तसेच वेब डायग्रामचा समावेश असेल. प्रश्न क्रमांक सहामध्ये न्यूज रिपोर्ट करणे, टायटलवरून बातमी तयार करणे असेल. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी डेटलाइन, लीड व शेवटी कन्क्लुझन योग्य पद्धतीने करावयाचे आहे.
सातवा प्रश्न हा पासिंग व स्कोअरिंगसाठी फायद्याचा आहे. यामध्ये शब्दांचे भाषांतर, वाक्याचे भाषांतर, वाक्प्रचाराचा उपयोग (प्रोव्हर्ब) असे प्रश्न असतील. पासिंगसाठी काय करावे… प्रश्न क्रमांक एक, दोन व तीन चांगल्या पद्धतीने सोडवावेत, सातवा प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवावा, याच प्रश्नाच्या उत्तराचा सराव घरी अधिक करावा, परीक्षेत सोडवलेले प्रश्न पुन्हा वाचून तपासावेत, जेणेकरून त्यात चुका राहणार नाहीत. स्कोअरिंगसाठी असलेले मुद्दे प्रश्न क्रमांक ५ व ६ च्या सरावावर अधिक भर द्यावा, अवांतर वाचन व रायटिंग स्किलकडे अधिक लक्ष द्यावे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *