भोंडेकर शिक्षण संस्थेने शिक्षणाचे व्यापारीकरण होऊ दिले नाही!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एकेकाळी नर्सिंग क्षेत्रात शिक्षणाकरीता भंडारा जिल्ह्यातील मुला मुलिंना मोठ्या शहरांकडे जावे लागत असे, परंतु आज स्थिति पालटलेली आहे. या क्षेत्रात भोंडेकर सांस्कृतीक किडा व सामाजीक शिक्षण संस्थेने पाय मजबूत केला असून नर्सिंग शिक्षणाच्या क्षेत्रात संस्थेच्या भरीव कार्यक्रमामुळे आता अन्य जिल्हातील विद्यार्थी विद्यार्थिनी भंडारा जिल्हात शिक्षणासाठी येताना दिसत आहेत. त्याचे एक मात्र कारण म्हणजे भोंडेकर शिक्षण संस्थेने शिक्षणाचे व्यापारीकरण न करता दजेर्दार शिक्षण देण्यावर अधिक भर दिला. भोंडेकर सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ अश्विनीताई भोंडेकर यांनी संस्थेचे वार्षिक अहवाल पठन करताना वरील विचार व्यक्त केले. संस्थे द्वारे एकविसाव्या वर्धापण सोहळ्या निमित्त तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र पालान्दुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा अधिकारी योगेश कुंभेजकर, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंजुळा ताई भोंडेकर व उपाध्यक्ष रमेश चवडे यांच्या उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माती मंद शाळेत आयोजित स्नेह संमेलनाच्या प्रथम दिनी शिक्षण संस्थे अंतर्गत च्या नर्सिंग विद्यालय, बीए व अन्यविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले. ज्यात एकल नृत्य, समूह नृत्य, फॅशन शो सारख्या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला संबोधित करताना सौ अश्विनी ताई भोंडेकर म्हणाल्या की, भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय आहे की नर्सिंग क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी आज भंडाºयात येत आहेत. येणाºया काळामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे मानस व्यक्त करीत त्यापुढे म्हणाले की केवळ पूर्व विदर्भच नव्हे तर शेजारील राज्य छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मधील युवकांना भंडाºयामध्ये दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमात उपस्थितीत विद्यार्थ्यांना नरेंद्र पालान्दुरकर यांनी सुद्धा नर्सिंग क्षेत्रातील रोजगारा विषयी मार्गदर्शन करीत या क्षेत्रात विदेशात ही रोजगाराची संधी असल्याची माहिती दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *