भाजपच्या जिल्हा कार्यालय इमारतीचे भूमिपूजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन आज भिलेवाडा येथील पक्षाच्या स्वत:च्या मालकीच्या जागेवर खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी अत्याधुनिक असे कार्यालय उभे राहणार आहे. भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे पक्षाच्या मालकीची जागा असून या जागेवर आज विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रभारी संजय भेंडे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिºहेपुंजे, जिल्हा महामंत्री चैतन्य उमाळकर, माजी आ. हेमकृष्ण कापगते, श्याम झिंगरे, प्रदीप पडोळे, प्रा. हेमंत देशमुख, प्रकाश बाळबुधे, डॉ. उल्हास फडके, प्रशांत खोब्रागडे, मुन्ना पुंडे, भंडारा तालुकाध्यक्ष विनोद बांते, नीचे तालुकाध्यक्ष मोहन सु-रकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिºहेपुंजे आणि मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. मेंढे यांनी निर्माण होत असलेल्या कार्यालया विषयी माहिती दिली.

३ मजली कार्यालयाचे बांधकाम १७ हजार फूट राहणार असून अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त व तांत्रिक दृष्ट्या स्वयंपूर्ण असेल असेही खा. सुनील मेंढे यांनी सांगितले. राज्यातील १० कार्यालयांचे बांधकाम सुरू होत असून त्यात भंडारा असल्याचे सांगताना हे अभिमानाचे असल्याचे ते म्हणाले. येत्या एक दीड वर्षात हे बांधकाम पूर्ण व्हावे या दृष्टीने प्रयत्न राहणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *