समता नगर फेज २ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील गौतमबुद्ध वार्डातील सनराइज अपार्टमेंट समोर समता नगर फेज २ येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी एन.एम.डी महाविद्यालय गोंदिया येथिल समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बबन मेश्राम होते तर प्रमुख उपस्थिती नेमिचंद बागडे, प्राचार्य कुंदन ढोक, राजेश राऊत होते.मार्गदर्शन करतांना डॉ.मेश्राम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरआणि सामान्य माणसाचे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे नाते कसे होते याविषयी अनेकांना कुतूहल असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते, पण ते पित्याच्या वात्सल्याने आणि ममत्वाने सर्वांशी वागत असत म्हणून त्यांना बाबासाहेब म्हटले जाऊ लागले, अशा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या जयंती निमित्त जनसामान्य लोकात पसरवणे काळाची गरज आहे. यानंतरमहाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यशस्वीतेकरीता प्रकाश बागडे, प्रवीण कानेकर, वसंत कांबळे, राहुल कांबळे, शावलिन कांबळे, राजु बावणकर, सचिन बागडे, गजानन बादशहा, श्रावण साखरकर, जगतपाल पारधी, प्रशांत मेश्राम, मृणाल हुमणे, निमजे व समता नगर फेज २ रहिवासी यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमास महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार सामाजिक कार्यकर्ता राजेश राऊत यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *