न्यायालयाची नागपूर विद्यापीठ प्रशासनाला चपराक; १७ डिसेंबरच्या पदवीधर निवडणुकीला स्थगिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महा- राज नागपूर विद्यापीठाच्या १७ डिसेंबर ला होणाºया पदवीधर निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विद्यापीठ प्रशासनावर ताशेरे ओढत न्यायालयाने मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. विद्यापीठाने पदवीधर निवडणुक ३० नोव्हेंबरला जाहीर केली होती. मात्र, मतदानाचा बुधवार दिवस येत असल्याने अनेकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे ११ डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अधिसभा पदवीधर निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये त्रूटी असल्याचा दावा करणारी याचिका माजी अधिसभा सदस्य प्राध्यापक प्रशांत डेकाटे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. याचे कारण समोर करून विद्यापीठाने ११ डिसेंबरच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष केले. याचिकेवरील सुनावणी दरम्यान विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि अधिवेशनामुळे निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवत नव्या तारखांची अधिसूचना काढण्याचे शपथपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार १७ डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान निवडणूक होणार होती. मात्र बुधवारी न्यायालयाने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याशिवाय मतदार यादीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *