पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करणाºयास अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेत वहिवाटीसाठी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी मागील १८ दिवसांपासून गावातील जलकुंभावर आंदोलन करणाºया शेतकºयाने पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने मंगळवार, १३ डिसेंबर रोजी आंदोलन मागे घेतले. गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील शेतकरी पूरनलाल पारधी (४५) यांनी त्यांच्या शेतावर जाणाºया पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी २५ नोव्हेंबरपासून गावातीलच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन पुकारले होते. यापूर्वी पुरणलाल यांनी संबंधित विभाग व अधिकाºयांकडे पत्रव्यवहार करून न्याय देण्याची मागणी केली होती. महसूल प्रशासनाने रस्ताही मोकळा करून दिला होता. परंतु अतिक्रमणधारकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून त्यांच्या आवागमणाचा मार्ग बंद केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी वारंवार संबंधित विभागाकडे न्यायाची याचना केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

अखेर त्यांनी गावातील जलकुंभार चढून आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे प्रशासनाची झोप उडाली होती. अनेकदा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. परंतु ती निष्फळ ठरली. अखेर पोलिस प्रशासन आणि महसूल अधिकाºयांनी मंगळवारी आंदोलन स्थळ गाठून पुरणलाल यांची समजूत काढली. त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुपारी आपत्ती व्यवस्थापनचे पथक, पोलिस कुमक आणि महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांना जलकुंभाखाली उतरविण्यात आले. यानंतर अधिकाºयांनी पुरणलाल यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणी कलपाथरीच्या ग्रामसेवकाच्या तक्रारीवरुन पुरनलाल पारधी यांच्याविरोधात गोरेगाव पोलिसांनी कलम २६८, २९०, ३०९ भारतीय दंड संहिता, सहकलम ३३ (एम) मपोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *