जागतिक सिकलसेल आजाराबाबत जिल्हा आरोग्य प्रसासनातर्फे जनजागृती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजाग्रुती होण्याच्या द्रुष्टिने दर वर्षी राज्याने निवडक जिल्ह्यामध्ये जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह ११ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान राबविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत दि. ११ डिसेंबर रोजी केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे प्रभात फेरीच्या माध्यमातून सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी हिरवी झेंडी देऊन उद्घाटन केले. प्रभात फेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून निघून स्टेडियम मैदान, जयस्तंभ चौक भागात सिकलसेल आजाराराबाबतचे संदेश देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक आरोग्य संस्थेत सिकलसेल सोल्युबिलिटी चाचणी मोफत केली जात आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह असल्यास हिमोग्लोबिन एलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केली जाते.त्यावरुनच रुग्ण ग्रस्त आहे कि वाहक आहे मग लक्षणा नुसार औषधी दिले जातात. वाहक रुग्णाला पिवळे कार्ड तर ग्रस्त रुग्णाला लाल लाल कार्ड देण्यात येते. निरोगी व्यक्तीला पांढरे कार्ड दिले जाते. म्हणुन साधे भाषेत म्हणतो पिवळे – पिवळे, लाललाल, पिवळे- लाल कार्ड व्यक्तीनी विवाह करु नका. त्यांनी पांढरे कार्ड व्यक्तीशी विवाह करा जेणे करुन सिकलसेल ग्रस्त पिढी निर्माण होणार नाही.

सिकलसेल आजार अनुवांशिक आहे पण संसर्गजन्य नसल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी या प्रसंगी केले आहे. सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. या आजाराचे संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण मात्र शक्य आहे. तरी जिल्ह्यातील नवयुवकांनी आवर्जून पुढे येऊन सिकलसेल बाबत सोल्युबिलिटी तपासणी करावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी केले आहे. प्रभात फेरी दरम्यान अर्चना वानखेडे, डॉ.स्नेहा वंजारी, डॉ.सुवर्ना उपाध्याय, डॉ.मिना वट्टी, सपना खंडाईत, अर्चना शिवणकर, अ‍ॅडव्होकेट रेखा सपाटे, स्वाती पाटील, संध्या शंभरकर, भाविका बघेले, सपना ठाकरे, डॉ. कांचन भोयर, नीलू चुटे, जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ पारधि, नैकाणे, बाई गंगाबाई स्त्री रुग़्णालयातील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व केटीएस सामान्य रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *