भरधाव कार झाडाला धडकली एक मृत, चार जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सडक अर्जुनी : भरधाकार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळून झालेल्या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथून गेलेल्या गोंदिया कोहमारा महामार्गावर आज मंगळवार ९ मे रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद फयान फारुख शेख (२४) असे मृतकाचे नाव आहे. तर जखमींमध्ये अखिल पांचाळू (२९) , समीर नसीर शेख (२६), अंजुम अफरोज शेख (३२), राणू कुरेशी (२८) यांचा समावेश आहे.

गोंदिया कडून नागपूरला कार्यक्रमानिमित्त जात असलेल्या स्विμट डिझायर गाडी क्रमांक एमएच ४१ एएस २५९५ अनियंत्रित होऊन जवळील भुसारीटोला गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आढळल्याने मोठा अपघात झाला. ह्यात गाडीचालक फयान शेख जागीच ठार झाला. वाहनातील इतर संविधान गंभीर जखमी झाले. त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. धडक एवढी जबरदस्त होती की वाहनाचा समोरील भाग अक्षरश: क्षतीग्रस्त झाला. डूग्गीपार पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास ठाणेदार रेवचंद सिंगंनजुडे करीत आहेत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.