महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी धनंजय दलाल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, खासदार प्रफुलभाई पटेल, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्र प्रदेश च्या नवीन कार्यकारिणी मधे धनंजय दलाल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली. धनंजय दलाल यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजु कारेमोरे, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, अ‍ॅड. जयंत वैरागडे, यांना दिले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, यशवंत सोनकुसरे, डॉ. श्रीकांत वैरागडे, डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. जयदिश निंबार्ते, अ‍ॅड. विनयमोहन पशिने, महेंद्र गडकरी, महाकाळकर, . रजनिश बन्सोड, नंदा झंझाड, आशा डोरले, अविनाश ब्राम्हणकर, राजु देशभ्रतार, दिपलता समरीत, लता नरुले, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, रत्नमाला चेटुले, सुनिल साखरकर, उमेश ठाकरे, बाबुराव बागडे, प्रदिप सुखदेवे, जुगल भोंगाडे, मंजुषा बुरडे, अ‍ॅड. नेहा शेंडे, भानुदास बनकर, राजु हाजी सलाम, तुमसर ता. अध्यक्ष धनेंद्र तुरकर, मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव देंगे, लाखनी ता. अध्यक्ष नागेश पाटील वाघाये, पवनी ता. अध्यक्ष विजय सावरबांधे, लाखांदूर ता. अध्यक्ष बालु चुन्ने, साकोली ता. अध्यक्ष अंगराज समरीत, शहर अध्यक्ष धनु व्यास, योगेश सिंगनजुडे, पवन चव्हाण, सुरेश बघेल, हरिष तलमले, अ‍ॅड. मोहन राऊत, शेखर (बाळा ) गभने, राहुल निर्वाण यांनी अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *