आज “आधार” या नाट्य प्रयोगाचे आयोजन

भंडारा : दिवाळीच्या पावन पर्वावर विदभार्तील भंडारा,गोदीया,चंद्रपूर,गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बहुसंख्य असलेला शेतकरी आपली शेतीची कामे जेमतेम आटोपून जरा मोकळा होत असतो आणि त्याचा आनंद साजरा करण्यादृष्टीने गावागावात मंडई व त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.पवनी तालुक्यातील मौजा बाचेवाडी येथेही दिवाळीच्या पावन पर्वावर बुधवार दि.२ नोव्हेंबर २०२२ ला मंडई व त्यानिम्मित गावातील तरूणानी एकत्र येऊन तयार केलेल्या “झुंजार नाट्य कला मंडळाचे” वतिने गावातीलच लोकेशजी भेंडारकर लिखीत,निमार्ता पराग मोहरकर तसेच इंजिनीयर जयेशजी लांजेवार दिग्दर्शीत तसेच गावातीलच नाट्य कलावंताचा अभिनय असलेला तिन अंकी नाटक “आधार” या नाट्य प्रयोगाचे आयोजन रात्री ९ वाजता स्व.मुकाजी भुरे याचे भव्य प्रांगणात केलेले आहे तरी सदर नाट्य कार्यक्रमाचा आस्वाद परीसरातील नाट्यरसिकानी घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *