शरद पवार अत्यवस्थ…रुग्णालयात दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना राजधानी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आठवड्यातच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे वृत्त आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाºया पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही ते सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असे पक्षाने सांगितले आहे. तसेच ४-५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत होणाºया शिबिरात ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *