पोलीस शिपाईच निघाला ‘त्या’ चोरीचा मास्टरमाइंड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : घेतलेल्या सावकारी कर्जाच्या पैशासाठी तगादा लावणाºया सावकाराला धाक दाखविण्यासाठी एका पोलीस शिपायाने चक्क न्यायालयाच्या पोलीस गार्ड रूममधुन रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली.या विषयी भंडारा पोलीसांनी आरोपी पोलीस शिपाई निलेश खडसे याला अटक करून त्याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसे जप्त केली . पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक चौधरी हे २९ आॅक्टोबरला नेहमीप्रमाणे रात्री दरम्यान शासकीय कार्यालयातील पोलीस गार्ड तपासणीवर होते. याचवेळी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयातील पोलीस गार्ड रूममध्ये कर्तव्यावर असलेले सहायक फौजदार सुनील सयाम यांचा फोन आला. त्यामध्ये त्यांनी मुद्देमाल गार्डमधील एक रिव्हॉल्व्हर व नऊ एमएमचे ३५ काडतुसे नसल्याची माहिती दिली. याबाबत पोलीस निरीक्षक चौधरी यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीसअधिकाºयांना माहिती दिली व घटनास्थळी रवाना झाले. रात्रीलाच न्यायालयातील गार्ड कक्षाची तपासणी केली असता सहायक फौजदार सुनील सयाम यांच्या नावे ताब्यात मिळालेली एक ०.३८ ची एक रिव्हॉल्व्हर व सहायक फौजदार चोले यांच्या ताब्यातील ३५ काडतुसे चोरीला गेल्याची बाब उघडकीला आली. गार्डमधील उपस्थित अमलदारांना विचारपूस करण्यात आली. घटनेची खात्री झाल्याने राखीव पोलीस निरीक्षक चौधरी यांनी भंडारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल राहाटे यांच्याकडे सोपविण्यात आला.

सावकाराला धमकाविण्यासाठी सगळा प्रकार…

पोलीस शिपाई निलेश खडसे याच्या कबुली जबाबानंतर सगळी घटना उघडकिस आली. कर्जबाजारीपणामुळे त्यांना पैशासाठी सततचा तगादा लावला जात होता. परिणामी सावकाराला धडा शिकवण्यासाठी आपण न्यायालयातील पोलीस गार्ड कक्षामधून रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसांची चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेले साहित्य सिव्हिल लाईन परिसरातील एका कक्षातून लपवून ठेवल्याचेही सांगितले. त्यानुसार रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसे जप्त करण्यात आली.

असे फुटले बिंग….

सदर प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने घटनेबाबत पोलीस गार्ड कक्षामधील सर्व अमलदारांची सखोल विचारपूस करण्यात आली. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपाई चव्हाण यांनाही विचारपूस करण्यात आली. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार २९ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलीस शिपाई निलेश खडसे यांची ड्युटी नसतानाही ते एक बॅग घेऊन न्यायालयातील गार्ड कक्षात आले होते.तिथे ते एकटेच पाच मिनिटे थांबून शस्त्रांची तपासणी केली व बॅगसह तिथून निघून गेल्याचे सांगितले.यावरून पोलीसांना निलेश खडसे यांच्यावर दाट संशय आला.

सीसीटीव्ही फुटेजचा शिक्का

महिला पोलीस शिपाई चव्हाण यांच्या बयानानंतर जिल्हा न्यायालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची तपासणी करण्यात आली. यात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता गार्ड पहाºयावरील अंमलदार पोलीस शिपाई निलेश खडसे हा आपल्यासोबत संशयास्पद एक बॅग घेऊन जाताना दिसून आला तसेच त्याच्या एकंदरीत हालचालीवरून त्याच्यावर संशय बळवल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *