गुंजेपार/किन्ही येथे राष्ट्रसंतांचे पुण्यतिथी महोत्सव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील गुंजेपार येथील श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर रोजी दरम्यान दोन दिवसीय वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी महोत्सव आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता आज सोमवार ७ नोव्हेंबर रोजी गोपालकाल्याने माजी आमदार बाळाभाऊ (राजेश) काशिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वरजी बुराडे महाराज, गुरूदेव सेवा मंडळ ता. अध्यक्ष रमेश भैय्या, जि.प. सदस्या लताताई नरूले, काँग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष उत्तमजी भागडकर, काँग्रेस प्रदेश सचिव प्रमिलाताई कुटे, पं.स. सदस्य मनोज भुरले, गोविंदराव भुरले गुरजी, दामोधरजी पारधी, सरपंच वषार्ताई तोंडरे, उपसरपंच मनोहर कुटे, नगरसेवक रिजवान पठान, जितेंद्र ढोरे, रमेश पारधी, विलास नरूले यासह आदी मान्यवर व भाविक भक्त उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *