भंडाºयात प्रथमच पत्रकारांचे भव्य अधिवेशन २० रोजी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विविध दैनिके, साप्ताहिक वृत्तपत्र आणि ईलेक्ट्रानिक माध्यमांतील पत्रकारांना मंच मिळावा या उदात्त हेतूने ‘व्हाईस आॅफ मीडिया’ या अग्रणी राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या भंडारा शाखेच्या पुढाकाराने भंडाºयात पहिल्यांदाच पत्रकारांचे जिल्हास्तरीय अधिवेशन मंगळवार, २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी राहतील.

प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, प्रमुख वक्ते म्हणून लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, डिजीटल तरूणभारतचे संपादक शैलेश पांडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, जिल्हा माहितीअधिकारी शैलजा वाघ-दांदळे तर स्वागताध्यक्ष हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जैकी रावलानी उपस्थित राहणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.