२३ हजार शेतकºयांना मिळणार नुकसान भरपाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गतवर्षी सप्टेंबरमधील अतिवृष्टी व नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या धान व इतर पिकांची प्रचंड हाणी झाली. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. गोंदिया तालुक्यातील सुमारे २३ हजार शेतकºयांना नुकसान भरपाईसाठी ३२ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत केली जाणार आहे. सततच्या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने उभ्या पिकांची प्रचंड हाणी झाली. नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ. अग्रवालांनी मागणी शासन दरबारी उचलून धरली. शासनाने शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत नुकसान भरपाई देण्यासाठी यंत्रणेला कामावर लावले. जिल्ह्यातील ६० हजाराच्यावर शेतकºयांना अतिवृष्टी व अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी ६७ कोटी मंजूर करण्यात आले. गोंदिया तालुक्यातील २३ हजार शेतकºयांना ३२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. २७ हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे तिन हेक्टरच्या मयार्देत नुकसान भरपाई मिळणार आहे. लवकरच नुकसान भरपाईची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग केली करण्याची सूचना अग्रवालांनी अधिकाºयांना केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *