ट्रॅक्टरची एसटी बसला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा येथुन भंडारा कडे जात असलेल्या एस टी बसला सिमेंट विटा भरुन भरधाव येणाºया ट्रॅक्टरने जबरदस्त धडक दिल्याने बस व ट्रॅक्टरचे नुकसान झाले असले तरी कुणालाहि दुखापत झाली नसून बस चालकाचे तक्रारीवरून ट्रॅक्टर चालका विरुद्ध तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिनांक ३ मार्च रोजी भंडारा आगाराची बस क्रमांक एम एच ९७ सी ९४५२ तिरोडा बसस्थानका वरुन ८-३० वाजता निघुन बडेगाव कडून गांगला मार्गे भंडारा कडे जात असता बोरगाव गागंला चे दरम्यान एका वळणावर समोरून भरधाव सिमेंट विटा भरून येणारे ट्रॅक्टर क्रमांक २ जी ७६७८ एसटी बसला मागचे चाकाजवळ जबरदस्त धडक दिली सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही या धडकेत बसचे चालक मंगेश रामलाल भोवते व वाहक रोशन पुंडलिक देशमुख यांचे सह बस मधील तीन प्रवासी व ट्रॅक्टर चालक तथा ट्रॅक्टर वरील चार हमाल कुठलीही दुखापत न होता बचावले असून बस चालक मंगेश भोवते याचे तक्रारी वरून ट्रॅक्टर चालक चंद्रकांत विजय धुर्वे लेदडा याचे विरोधात तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिरोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *