आईसह मुलावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला

भंडारा पत्रिका गोंदिया:- गोंदिया शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्रीनगरातील चंद्रशेखर वार्डातील रहिवासी महीला आपल्या मुलासह घरात असतांना एका अज्ञाताने घरात शिरुन हल्ला केल्याची घटना आज बुधवारच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत गंभीर जख्मी झालेल्या मुलावर गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहे. संध्या महेन्द्र कोरे (४८) रा. चंद्रशेखर वॉर्ड,श्रीनगर गोंदिया असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे. तर या घटनेत गंभीर जख्मी झालेला मृताचा मुलगा करण महेन्द्र कोरे (२४) रा. चन्द्रशेखर वॉर्ड श्रीनगर गोंदिया याचे वर गोंदियातील के.टी.एस. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. महीलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने ५ ते ६ घाव घातले होते. त्यामुळे सदर घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला असल्याचे त्यांचा संपूर्ण किचन रक्ताने माखलेला होता.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जख्मी मुलाला उपचाराकरिता रवाना केले. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. प्रकरण नेमकं काय हे मुलगा सांगू शकेल पण त्यावर सध्या उपचार सुरू असल्यामुळे त्याचा बयान घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली असल्याचे शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बुधवारी दुपारी पोलिसांनी परत एकदा घटना स्थळी जाऊन पुन्हा चौकशी केली. पण अद्याप अंतिम निष्कर्ष पर्यंत पोहचले नाही. प्रकरणाचा तपास गोंदिया शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *