धान खरदी कदावर मयादपक्षा अधिकचा धान आला कठन?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील खांबा, सेंदूरवाफा,वलमाझरी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर मर्यादेपेक्षा जास्त धान्यसाठा असल्याची माहिती पुढे येत आहे. धान उत्पादक शेतकºयांची लुबाडणूक करून स्वस्त दरात धान खरेदी करून खाजगी व्यापारी शासकीय आधारभूत धान खरेदीकेंद्रावर जास्त दर मिळत असल्याने साठवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. मर्यादेपेक्षा अधिकचा धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आला कुठून ? हा संशोधनाच्या विषय आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे शेतकरी वतुर्ळात व्यक्त करण्यात येत आहे.

या तीनही आधारभूत धान खरेदी केंद्रांना जिल्हा विपणन विभागाच्या वतीने ४००० क्विंटल दान खरेदी करण्याची मंजुरी दिली होती ही खरेदी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जिल्हा विपणन अधिकारी यांनी ४००० क्विंटल धान खरेदीची मयार्दा वाढवून दिली होती मात्र या खरेदी केंद्रावर प्रत्यक्षात २० ते २२ हजार क्विंटल धान साठवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात धान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे चित्र उघडकीस येत आहे. धान खरेदी केंद्रांवर अशा प्रकारच्या गैरव्यवहाराचे अनेक प्रकरण जिल्ह्यात गाजत असताना पुन्हा शेतकºयांच्या सातबाराच्या बोगस नोंदण्या करून खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात मर्यादेपेक्षा जास्त साठा करून गैरव्यवहार करीत असल्याचे बोलल्या जात आहे.

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाचे दर अधिक मिळत असल्याने खाजगी व्यापारीशेतकºयांकडून स्वस्त दरात नगदी पैसे देऊन धान खरेदी करीत आहेत. शेतकरी पैसे नगदी मिळत असल्याने खाजगी व्यापाºयांना स्वस्त दरात धान विकून बळी पडत आहेत. खरेदी केलेला सदर धान शेतकºयांचे सातबारे बोगस रित्या नोंदवून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर देण्यात येत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र संचालक व खाजगी व्यापारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी वरिष्ठ स्तरावरून सर्वकष चौकशी केल्यास बरेच काही उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *