वाघाच्या अवयवांची तस्करी करणाºया दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पंधरा वाघनखांसह तीन सुळे व इतर अवयवांची विक्री करणाºया दोन आरोपीला वन विभागाच्या पथकांने तुमसर तालुक्यात रंगेहाथ अटक केली. जंगलव्याप्त असलेल्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही नाकाडोंगरी परिसरात वाघांच्या अवयवांची तस्करी होत असल्याची माहिती वन अधिकाºयांना मिळाली होती. माहितीच्या आधारे १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान दक्षता विभाग, वनविभाग नागपूर, फिरते पथक भंडारा तसेच वनक्षेत्र नाकाडोंगरी येथील वन अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्तरित्या बनावट ग्राहक बनून सापळा कारवाई केली. यावेळी वाघाच्या अवयवांची तस्करी करण्याºया रामू जयराम उईके रा. पवनारखारी व संजय श्रीराम पुष्पतोडे रा. चिखला यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या अनुसूची १ मधील वन्यप्राणी वाघाच्या शरीर अवयवांसह रंगेहात विक्री करीत असतांना पकडण्यात आले. आरोपींकडून ३ सुळे दात, १५ वाघ नखे, इतर शरीराचे हाडांचे अवशेष व मोटारसायकल जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर रंगनाथ नाईक, भंडारा जिल्हा उपवनसंरक्षकराहूल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, गडेगाव आगार वनविभाग भंडारा, नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे करीत आहेत.दर सापळा कारवाईत विभागीय वन अधिकारी प्रितमसिंग कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, संदीप गिरी, पी.एम.वाडे, एन.डी. तवले, जी.जी. जाधव, वाय.डी. ताडाम, व्ही. एस. शेंडे, डी.के. पडवाल व प्रफुल्ल खोब्रागडे यांच्यासह वनक्षेत्र नाकाडोंगरी येथील वनाधिकारी व वनकर्मचारी सहभागी होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *