अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी वनपरिक्षेत्रातील जांभळी मध्यवर्ती रोपवाटिका नजीक रायपूर ते साकोली रस्त्यावर वन्यप्राणी बिबटाचा (नर) अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना दिनांक २० आॅक्टोबर रोजी घडली असून. यापूर्वी सुद्धा या महामार्गावर काही महिन्यापूर्वी एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. जंगल व्याप्त क्षेत्र असल्याने वन्यजीवांचा वावर महामार्गावर तसेच ग्रामीण शेत शिवारात होत आहे. हिंसक वन्य प्राण्यांचा वावर शेत शिवारात व गावात वाढत असल्याने नागरिकांचे जीव व शेतकºयांचे पशुधन धोक्यात आल्याचे चित्र आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महामार्गावर बिबट्या मृत झाल्याच्या घटनेची माहिती सकाळी १० वाजेच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मिळताच स्थानिक वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. प्राथमिक तपासणी करुन मृत बिबटास जांभळी मध्यवर्ती रोपवाटीकेत नेण्यात आले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार डॉ. हेडाऊ, पशुधन विकास अधिकारी साकोली यांचेद्वारे मृत बिबटाचे शवविच्छेदन करण्यात आले. बिबटाच्या शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव यावरून वाहनाच्या जबर धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर संपूर्ण कार्यवाही श्री राहुल गवई, उपवनसंरक्षक भंडारा, श्री रोशन राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, साकोली, श्री सुरज गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी, श्री नदीम खान, मानद वन्यजीव रक्षक भंडारा , Wild watch foundÔtion NGO, SEAT NGO व GreenFriend Nature Club NGO
चे प्रतिनिधी यांची उपस्थितीत करण्यात आली. मृत बिबटाचे वय अंदाजे ७ ते ८ वर्ष असून दिनांक २७ जुलै २०२२ रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत किरकोळ जखमी झालेल्या याच बिबटाने श्री सानप वनरक्षक यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *