निलज-भंडारा रोडवरील जलद गतीने होणाºया वाहतूकीचा वेग कमी करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : शहरातील जवाहर गेट बाहेर निलज रोड आणि भंडारा रोड कडून भरधाव वेगाने वाहने येतात-जातात. सदर चौकातील वाहनांचा वेग बॅरीकेट्स लावून कमी करण्यासाठी व्यापारी असोसिएशन पवनी तर्फे पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन पवनी यांना निवेदन देण्यात आले. पवनी येथील जवाहर गेट बाहेरून निलजभंडारा हाईवे रोड आहे. सदर रोडनी खूप गर्दी राहत असून नागपूर कडून येणारी भरधाव वाहने भंडारा कडून येणाºया वाहनांना दिसत नाही. त्यामुळे गेट बाहेरील चौकात अपघातांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यामध्ये अनेक व्यापाºयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच अनेकांचे अपघात होवून प्राण गेलेले आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. सदर रस्ता मुख्य वाहतूकीचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांचा वेग जास्त असतो. अशामध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी सदर रस्त्याने आणि चौकातून ये-जा करीत असतात. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात वाहनांची, प्रवाशांची, लोकांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी असते.

त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना या परिसरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने चौकाच्या शंभर मीटर पूर्वी निलज कडून येणाºया वाहनांचा आणि भंडारा कडून येणाºया वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रोडवर बॅरीकेट्स लावून वाहनांचा वेग नियंत्रित करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी व्यापारी असोसिएशन पवनी द्वारा पोलिस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन पवनी यांना केलेली आहे. निवेदन देताना व्यापारी असोसिएशन पवनीचे अध्यक्ष देवराज बावनकर, उपाध्यक्ष दत्तू मुनरतीवार, सचिव महादेवजी शिवरकर, मार्गदर्शक राजुभाई ठक्कर, लिलाधर मुंडले, श्याम राठी, विवेक चामोरशिकर, किशोर भांडारकर, अभिषेक गोमासे, विजय ब्राह्मणकर, अभिजित मोटघरे, तब्बूभाई सय्यद आदी अनेकजण उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *