पत्रकारीता एक धर्म आहे : डॉ. लोहित मतानी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पत्रकारीतेचे नैतिक आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण होणे आज काळाची गरज आहे. त्याकरीता भारतातील पत्रकारीतेची निकोप वाढ व्हावी व गुणात्मक विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारसह पत्रकारांची भुमिका अतिशय महत्वाची आहे. पत्रकारीता एक धर्म असून पत्रकारांनी लिखाण करतांना केवळ वाहवा न करता आलोचना सुध्दा केली पाहिजे, असे प्रखर मत पोलीस अधिक्षक डॉ.लोहित मतानी यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारभवन येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवन येथे दि.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.लोहित मतानी होते. तर प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटुले, कोषाध्यक्ष डी.एफ.कोचे, वरिष्ठ पत्रकार प्रा.वामन तुरीले, कॉ.हिवराज उके आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला माल्यार्पण अर्पण करुन दिप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक भाषणातून चेतन भैरम यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विषद करुन विविध विषयांवर प्रकाश टाकला. त्यानंतर हिवराज उके, डी.एफ.कोचे, नितीन कारेमोरे, प्रा.वामन तुरीले, राकेश चेटुले, शशीकुमार वर्मा यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे कार्य, समाजाप्रती त्यांची भूमिका व मागील दोन वर्षांपासून पत्रकारांच्या निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक व मानसिक समस्या व त्यावरील उपाय यावर चर्चेतून संवाद साधला. पुढे बोलतांना डॉ.लोहित मतानी यांनी सांगितले की, पत्रकार हे समाजासाठी अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. आठवड्यातील सात दिवस अहोरात्र काम करीत असतात. तेव्हा त्यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणेगरजेचे आहे. आपण सुदृढ असाल तरच समाजातील समस्या मांडून ते सोडविण्यासाठी तत्पर असावे. मागील काही महिन्यांपासून पोलीस विभाग व पत्रकार यांच्या सोबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून शारीरिक व्यायाम करण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांसाठी पोलीस मैदानावरील चैतन्य मैदानावर दररोज सकाळी विविध खेळांचे आयोजन करुन कमीतकमी सकाळचा एक तास शारीरिक व्यायामाकरीता देण्यात यावा. तेव्हा आपण सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी डॉ.लोहित मतानी यांनी केले. तसेच मिडीयाला ज्या देशात स्वातंत्र्य नसेल ते देश आज देश अधोगतीला जात आहे. यात पाकिस्तान, चीन यासारख्या अनेक देशांचे उदाहरण देऊन मिडीयाला स्वातंत्र्य आबाधित ठेवणे हे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मी ज्या जिल्ह्यात कर्तव्यावर असतो ते माझे परिवार असतात. आपण त्यापैकीच माज्या परिवारातील सदस्य आहात. आपल्या माध्यमातून समाजात समाज विरोधी अथवा विघातक कार्य होत असतील ते आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडाव्यात. त्याची मी दखल घेऊन निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या प्रसंगी आश्वस्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.बबन मेश्राम यांनी केले. तर आभार सचिव मिलीव हळवे यांनी मानले. यावेळी नदीम खान, संदीप नंदनवार, देवानंद नंदेश्वर, प्रमोद गभने, अभिजीत घोरमारे, नंदू परसावार, इंद्रपाल कटकवाऱ, समीर नवाज, तथागत मेश्राम, अजय मेश्राम, प्रशांत देसाई, सुरेश कोटगले, दिलीप देशमुख, समशेर खान, मोहन धवड, दिपक रोहणकर, प्रविण उदापुरे, शशीकांत भोयर, प्रमोद भांडारकर, चंद्रकांत श्रीकोंडावार, यशवंत थोटे, संजय जयस्वाल, राजू आगलावे, यादवराव मुंगमोडे, जयकृष्ण बावनकुळे, तेजस मोहतुरे, सुरेंद्र चिंधालोरे, विलास सुदामे, निहाल भुरे, रंजित कांबळे, ललितसिंह बाच्छिल, सय्यद जाफरी, संघर्ष शेंडे, संजय मते, विलास केजरकर, युवराज गोमासे, शुभम देशमुख, विश्वकांत भुजाडे, सचिन मेश्राम, ब्रम्हदास बागडे, दिलीप बडोले, विलास मेश्राम, संजू बोंदरे, ओमप्रकाश गिºहेपुंजे, देवाजी मेश्राम, राकेश शामकुवर, सरवर शेख, विश्वजीत घरडे, संजय भोयर, गोवर्धन गोटेफोडे, प्रिया मेश्राम, राजेश हटवार, वामन चांदेवार, अरविंद दहिवले, नेपालचंद खंडाईत, विरेंद्र गजभिये, शैलेंद्र चांदेवार, मनोज माटे, चेतन शेंडे, रविशंकर कटकवार, पृथ्वीराज बंसोड आदींची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *