‘त्या’ नव्या कार्यकारणीवर होणार कार्यवाही

जीवन वनवे/ भंडारा पत्रिका तुमसर : शासनाच्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत तुमसर नगर परिषदेने नोंदणीकृत चर्मकार समाज सेवा संघाची परवानगी न घेता समाजाच्या मालकी जागेवर अनधिकृत बांधकाम केले. त्या संधर्भात तक्रार दाखल झाली. आणि चर्मकार समाजाच्या नविन कार्यकारणीचे बिंग फुटले. त्या नविन कार्यकारणीने नगर परिषदेला खोटे दस्तऐवज पुरवून व खोटी बांधकामास परवानगी देवून न. प. ची दिशाभूल केल्याने लाखो रुपयांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे उघडकीस आले. परिणामी नविन कार्यकारणी च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांवर कार्यवाही होणार असल्याचे संकेत आहेत. चर्मकार समाज सेवा संघ तुमसर रजि. नं. एफ.५० (बी) आहे. या संस्थेची नोंदणी मा. सहा धमार्दाय आयुक्त भंडारा कडून दि. १२-३-२०१९ अन्वये मंजूरी प्राप्त करण्यात आलेली आहे. चर्मकार समाजाच्या नोंदणीकृत पदाधिकाºयांची नांवे शेड्यूल (१) मध्ये आहेत, ह्या संस्थेच्या नोंदणीकृत संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करता समाजाच्या मालकीच्या जागेवर नगर परिषदेने शासनाच्या फंडाचा वापर करुन अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आला आहे. हा चर्मकार समाजाच्या लोकांवर अन्याय आहे.

यामुळे प्रस्तावित बांधकाम थांबविण्यात यावे, तसेच झालेले बांधकाम जमीदोस्त कराण्यात यावे अशी नोंदणीकृत पदाधिकाºयांनी तक्रार केली व माहिती च्या अधिकारात संस्थेची मान्यता आदी माहीती मागितली असता चर्मकार समाज सेवा संघाचा नविन कार्यकारणी ने खोटे मान्यता पत्र व संस्थेचे खोटे दस्तऐवज नगर परिषदेला देवून नगर परिषदेची फसवणूक केली हे स्पष्ट झाले. त्यावरून नविन कार्यकारणीचे अध्यक्ष सुरेश इस्तारी कनोजे, उपाध्यक्ष किशोर कवळु झाडे, सचिव रंधिर नत्थु तांडेकर, सहसचिव अमृतलाल इस्तारी कनोजे, कोषाध्यक्ष दिनेश मदन मालाधरे, सदस्य भिमराव केवळचंद मालाधरे, मेथु अशोक कनोजे, प्रकाश गोरेलाल जगणित, रुषतम राजेश मालाधरे, तुळशिदास केवल मराठे, विकास हरीराम मराठे, शर्मानंद किसन बर्वे या सर्व पदाधिकाºयावर धोखाधडी भादंवी चे कलम ४२० नुसार गुन्हे दाखल होणार असल्याची गुप्त सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणात पुढे कोणती कार्यवाही होते याकडे चर्मकार समाज बांधवांचे लक्ष लागून आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *