रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तिसऱ्या मार्गाची केली पाहणी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : गेज परिवर्तनासह पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या कामांतर्गत मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर तिसरा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर अधिक गाड्या चालवणे शक्य होणार असून प्रवासी रेल्वे सेवेत वाढ झाल्याने रेल्वे प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. या रेल्वे मार्गावर तिसºया लाईनमुळे गाड्यांच्या वेगात वाढ होणार असून त्यामुळे प्रवासाचा बराच वेळ वाचणार आहे. त्याअंतर्गत दक्षिण-पूर्व मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत दुर्ग ते नागपूर विभागात ३४२५ कोटी रुपये खर्चून तिसºया मार्गिकेचे काम जलदगतीने सुरू आहे. याअंतर्गत दुर्ग ते पनियाजोव आणि बोरतलाव ते दरेकसा या १२२.८ किमी आणि गोंदिया जिल्ह्यातील काचेवानी ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड यादरम्यान सुमारे २७ किमीचे कामही पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे १४ सप्टेंबर रोजी कोलकाता सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी यांनी काचेवानी ते तुमसर रोड पर्यंत १२२ किमी प्रतितास वेगाने इलेक्ट्रिक लोकोद्वारे यशस्वीरित्या तपासणी केली. त्यांनी विद्युतीकरणाच्या माध्यमातून गाड्यांच्या परिचालनात्मक बाबींची कसून पाहणी केली आणि अधिकाºयांशी चर्चा करून आवश्यक माहिती घेतली आणि योग्य मार्गदर्शन केले. यावेळी नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्यासह विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळाल्यानंतरच या रेल्वे मार्गावरील गाड्या विद्युतीकरणाद्वारे चालवल्या जातील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *