कुशारी येथे परमात्मा एक भवन सभामंडपचे रंजीता कारेमोरे यांच्या शुभ लोकार्पण

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री संत जगनाडे चौक,मोहाडी येथून ३ किमी अंतरावर असलेल्या कुशारी येथे तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या निधीतून परमात्मा एक सेवक सभामंडपाचे लोकार्पण कार्यक्रम बुधवार दि.१४ सप्टेंबर २०२२ ला रंजीता राजू कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंडळच्या वतीने रंजीता राजू कारेमोरे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र सुभाष ईलमे, सभापती रितेश वासनिक, आकांक्षा वासनिक, उपसभापती विठ्ठल मलेवार, उपसरपंच शखील वामन आंबागडे, प्रतिमा प्रमोद राखडे, सिंहदत्त मिश्रा, जेष्ठ मार्गदर्शक गुणाराम गडरीये, भाऊराव खोब्रागडे, लाला साकुरे, मते, मलेवार प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज सेविका, संपूर्ण परमात्मा एक सेवक व सेविका प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम संचालन नरेश भुरे यांनी केले तर आभार मार्गदर्शक गुणाराम गडरिये यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *