शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तर ओझ्यांच्या नियमांची अंमलबजावणी करा : शिवसेना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओज्याबाबत नियम घालून दिलेले आहेत. पण यात पालकांच्या प्रतिक्रिया आणि पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे हे अधिक दिसून आलेले आहे. यात विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा या नियमाकडे दुर्लक्ष करीत असून यात विद्यार्थ्यांना पाठ दुखी, मनक्याचा त्रास व पायांच्या स्नायुवर परिणाम होत असून नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर साहेब यांना मंत्रालय मुंबई येथे दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात केंद्र व राज्य सरकार यांच्या आदेशानुसार विद्यार्थी वजनाच्या १० टक्के पेक्षा अधिक दप्तराचे ओझे नसावे. पण या आदेशाची पायमल्ली होतांना दिसून येत आहे. या बाबत इंग्रजी माध्यमाच्या शाळेना विनंती करण्यात आली पण ते ऐकायला तयार नसल्याचे दिसून आले आहे. सामान्यत: एका बाकावर दोन विद्यार्थी बसतात. यात एकाने पुस्तक आणले तरी दोघांचेही काम सहज होऊ शकते. तसेच शाळा व्यवस्थापनाने पुस्तके शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करावी यातून दप्तरांचे ओझे कमी होण्यात मदत होऊ शकते. या बाबत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख पुष्पक त्रिभुवनकर, निखील कटारे, दिपक मलेवार, स्वप्निल बडवाईक, निखील कुंभलकर, योगेश चिंधालोरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *