तीस कोटी २७ लक्ष रुपयाची मोहाडीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर-सचिन गायधने

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या पावनभूमीत मोहाडीवासियांना शुद्ध पिण्याचे पाण्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. मात्र शासनाने आता मोहाडीसाठी तीस कोटी २७ लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. यासाठी माजी आमदार परिणय फुके व आमदार राजू कारेमोरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने मोहाडीवासियांचा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. तत्पूर्वी मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने यांनी वार्ताहर परिषदेतून याबाबत माहिती दिली. मात्र आता योजना मंजूर झाल्याचे पत्र ही मोहाडी नगरपंचायतीला प्राप्त झाले असून लवकरच कामही सुरू होणार आहे. भंडारा-तुमसर राज्यमार्गवर असलेल्या मोहाडीनगरवासी हे कित्येक वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच मोहाडीनगरीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होत होती. या दरम्यान अनेक सत्ताधारी आले, त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचे आश्वासन मोहाडी वासियांना दिले. अनेक वर्षापासून ही समस्या जैसे तिच्या वस्तीत होती. मात्र आता वर्तमान सत्ताधाºयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यश आले आहे.

मोहाडी येथील पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने, दिनेश शालिकराम निमकरसह, पदाधिकारी सातत्याने मुंबई येथील मंत्रालयात जाऊन प्रयत्नशील होते. माजी आमदार परिणय फुके व आमदार राजु माणिकराव कारेमोरे यांनीही विशेष पाठपुरावा केल्याने मोहाडी वासियांसाठी कोट्यावधी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने, दिनेश शालिकराम निमकर यांनी माजी आमदार परिणय फुके व आमदार राजू माणिकराव कारेमोरे याचे सह नगरपंचायतीचे सोबत असलेले सर्व पदाधिकारी व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले आहे. नगरोत्थान योजना, राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्याच्या दर्जा वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्या ठिकाणी मागणी व गरजेप्रमाणे निधी मंजूर करून नागरिकांना मूलभूत सुविधेचा लाभ दिला जातो.

कामाचा कालावधी अठरा महिने असून मोहाडी येथील तीस कोटी २७ लक्ष रुपयाची पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम लावेश्वर गावाजवळील वैनगंगा नदीच्यापात्रात होणार आहे. नदीपात्रापासून मोहाडी पर्यंत नवीन पाईप लाईन टाकली जाणार आहे. यानंतर फिल्टर प्लांटचे बांधकाम होऊन मोहाडीनगरवासींना शुद्ध पाण्याच्या नियमित पुरवठा होणार आहे. शासनाने या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरिता अठरा महिन्याचा कालावधी निश्चित केला आहे. माजी आमदार परिणय फुके व आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्यासोबत मोहाडी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सचिन बालचंद गायधने व दिनेश शालिकराम निमकर हे मुंबई येथे मंत्रालयात जाऊन रितसर तारीख घेऊन येत्या दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याचे मोहाडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष छाया डेकाटे यांनी दैनिक भंडारापत्रिका दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *