शेकडो शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला तर त्याच्या बॅकवॉटरमुळे चुलबंद नदीला देखील पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सोनी, केशोरी रयत आणि केशोरी खालसा व आवळी येथील शेतक-यांचे ऐन कापणीला आलेले शेतशिवारातील धानपीक व भाजीपाला पीक पूर्णत: नष्ट झाले. यामुळे शेतक-यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सलग चार वर्षांपासून सोनी वासियांना पुराचा फटका बसत असतांना शासनाकडून तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पाणे पुसली जात आहेत. त्यामुळे सोनी येथील शेकडो पिडीत शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडले. यावेळी शेतीचे पुनर्वसन करा अथवा दरवर्षी हेक्टरी एक लक्ष रुपये मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन लाखांदूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. मागील चार वर्षापासून गोसेखुर्द धरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन पीक कापणीच्या वेळी पूर परिस्थिती उद्भवत असून धानपिकासह तूर व भाजीपाला पिकाचे मोठ्यात प्रमाणात नुकसान होते. नुकसान लाखो रुपयाचे होत असतांना शासनाकडून दहा ते वीस हजार रुपयाची तुटपुंजी मदत केली जाते. तर सोनी येथील शेतकयांना गोसेखुर्द धरणाचा उपयोग पीक जगवायला होत नाही. मात्र गोसे खुर्द धरणातील पाण्याच्या विसगार्मुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन दरवर्षी हाताशी येणारे पीक नष्ट होत आहे.

यावर्षी देखील १८ व १७ सप्टेंबर ला आलेल्या पुराने सोनी येथील शेतकयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तर मौजा आवळी या गावाचे पुनर्वसन झाले असून येथील शेतक-यांना इंदोरा येथे शेतजमिनी देण्यात आल्या आहेत. तर याच आवळी शेतशिवारात सोनी येथील जवळपास ६५ शेतक-यांच्या शेती असतांना त्यांना शेतजमिनी देण्यात आलेल्या नाही. शासनाने गोसेखुर्द धरणाच्या पुरामध्ये नेहमीच बाधित होणा-या शेतक-यांच्या शेतीचे पुनर्वसन करावे अन्यथा दरवर्षी हेक्टरी एक लक्ष रुपये नुकसान भरपाई द्यावी, मागिल चार वषार्पासून नुकसान झालेल्या सोनी येथील शेतक-यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्याच्या निकषात शिथिलता आणून तो लागू करण्यात यावा, नियोजनशून्य कारभार करणा-या गोसेखुर्द धरण विभागाला होणा-या नुकसानीची माहिती देण्यात याव्या, शेतीला 24 तास वीज उपलब्ध करून द्यावे व गेल्या चार वषार्पासून उपयोगात आणलेले नसतांना आलेल्या कृषीपंपाचे विजबिल माफ करून रिडींग नुसारच पुढील वीजबिल देण्यात यावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदन देतांना जि.प. सदस्य डॉ. प्रतिक उईके, सरपंचा कुंता शहारे, उपसरपंच पुरूषोत्तम तलमले, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कावळे, ग्रामपंचायत सदस्य तुषार एंचिलवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत दरवरे, संघप्रिया वासनिक, दादाजी पिलारे, निखील मेघराज, भुषण चित्रिव, राहूल येवले, मदन एंचिलवार यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *