मंदिरातील दानपेटी चोरट्याला अटक

गोंदिया : तालुक्यातील चुलोद येथील मंदिरातील दानपेटी तसेच घरफोडी करुन टीव्ही चोरी करणाºया आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी अटक केली. आनंद सुखदेव रहांगडाले (२२, रा. चुलोद) असे आरोपीचे नाव आहे. चुलोद येथे १६ सप्टेंबर रोजी अज्ञात आरोपीने गावातील मंदिरातील दानपेटी व घंटी चोरी केली होती. तसेच गावातीलच हंसराज चौरे यांच्या घरी घरफोडी करुन एलसीडी टीव्ही चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास- ादरम्यान गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे आनंद सुखदेव रहांगडाले याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साहील कैलास राऊत, रा. चुलोद याच्यासोबत मिळून दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. साहील राऊत फरार आहे. पोलिसांनी आनंद रहांगडाले याला अटक करुन त्याच्याजवळून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला असून गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.