अंंतरगाव येथील आग पिडीत कुटुंबीयांना आ.नाना पटोले यांच्यातर्फे आर्थिक मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : सत्ताधारी असोत वा विरोधक, त्यांना जनतेच्या भल्याचे काही पडलेले नाही, सगळे फक्त स्वत:चा विचार करतात. राजकारण्यांवर अशी टीका बºयाचदा केली जाते. पण ही गोष्ट खोटी ठरवत एक राजकारणी मात्र जन सामान्यांच्या मदतीला धावून गेल्याचं सुखद चित्र दिसलं. अशात एक संवेदनशील चेहरा तो म्हणेज एक अनोखा हात. खरंतर ते हे जनसामान्याच्या कल्याणासाठी, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी पुत्र, भूमिपुत्र व गरीबाचे कैवारी म्हणून ओळख असलेले महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले हे मदतीला एका हाकेला धावून येणारा नेता म्हणून नानाची ओळख आहे. कुणाचा अपघात असो, कॅन्सर आजार असो, कुणी गंभीर आजारी असो, किंवा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असो अशा निराधारांना केव्हाही साकोली विधानसभा क्षेत्राचे आ. नाना पटोले हे आधार म्हणून सदैव उभे राहतात. असाच एक सहानुभूतीचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव/ चिंचोली या गावातील सुरेश विश्वनाथ बागडे यांच्या घराला आग लागली आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झालेल्या आ. नाना पटोले यांनी सुरेश बागडे यांना आर्थिक मदत देऊन एक मोठा आधार दिला. दोन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवासी सुरेश विश्वनाथ बागडे दोघेही पती – पत्नी रोजच्या प्रमाणे पोट भरण्यासाठी कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी मजुरीला गेले होते. आणि ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घरी चिमुकले दोन मुले घरी असताना अचानक घराला आग लागली व पाहता पाहता आगीने प्रचंड वेग घेतला. लगेच शेजाºयाच्या बाब लक्षात येताच आरडाओरड करुन गावकºयांनी आग आटोक्यात आणली.

घरी गॅस सिलेंडर होते. परंतू वेळीच आग नियंत्रणात आल्याने जिवीतहानी टळली. मात्र घरातील उदरनिवार्हाचे साहित्य बरोबरच आवश्यक असलेले कागदपत्रे जळून खाक झाले. अशातच कुटुंब उघड्यावर पडले. घरातील पांघरून सुद्धा नष्ट झाले होते. अशातच अंतरगाव येथील एका सुज्ञ नागरीकाने आ. नानाभाऊ पटोले यांना भ्रमणध्वनीवर कुटुंबाची माहिती सांगितली व लगेच आमदार पटोले यांच्या कडून त्या पिडीत कुटुंबातील व्यक्तीना आर्थिक मदत देवून आधार दिला. आ. नाना पटोले यांनी घराला आग लागलेल्या कुटुंबियाच्या मदतीसाठी एक हात समोर घेतल्याने व त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक तालुक्यात होत आहे. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तम भागडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओमप्रकाश सोनटक्के, भंडारा जिल्हा युवक काँग्रेस महासचिव सुभाष खिलवानी, जितु सुखदेवे, बबन रंगारी, हेमराज देशमुख व अन्य काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच अंतरगाव येथील नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *