तुडका येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुडका येथील साई मंदिराचे ११ वे वर्धापन दिन गुरूवारला थाटात पार पडले आहे. माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व परिवाराने त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून भक्तांना महा प्रसादाचे वितरण केले आहे. साई मंदिराचे वर्धापन दिनानिमित्त अभिषेक, हवन कार्य, महाआरती सह साईंच्या पालखीचे आयोजन त्या दरम्यान करण्यात आले होते. तूडका वासियांसह पडोळे यांनी निमंत्रित भक्तांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली होती. येथे साईंची पालखी व शोभा यात्रा कार्यक्रमाचे आकर्षण ठरली होती. दरवर्षी प्रमाणे तुडका येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनाचे आयोजन पडोळे परिवारातर्फे करण्यात आले होते. दरम्यान कोवळ्या सकाळी ६:३० वाजता साईंना अभिषेक घालून सकाळी ८ वाजता हवन कार्य व महा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने साई भक्तांनी येथे उपस्थिती दर्शवली होती. समस्त गावकºयांनी पालखीचे स्वागत करून आशीर्वाद घेतले. साई मंदिराच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमा दरम्यान प्रदीप पडोळे यांचे परिवारातील शिवशंकर पडोळे, दिपेश पडोळे, रुपेश पडोळे, दिलीप पडोळे, शीतल काळबांधे, बबलू पांडे, धर्मेंद्र मेहर, लंकेश चकोले, दीपक देशमुख, कर्मचारी वगार्तून सुमित वसानी,राखीलाल राणे, अरुण सहारे, शैलेश गजभिये, दिनेश पंचबुद्धे, गजानन पडोळे, उमेश तिड़के,रवि कहा लकर,कविराज कारेमोरे,कैलाशडडेमल,धर्मराज पटले, मनोज जेठमल,दीपक ओलाड़ी, दुर्योधन सहारे,तिवारी पंडित, परिवारातील महिलांमध्ये कांचन पडोळे, वनिता पडोळे, रजनी पडोळे, वर्षा चकोले, अदिती काळबांधे यांचे सह तुडका ग्रामवासी व तसेच तुमसर येथून सर्व पक्षीय राजकीय नेते, कर्मचारी, तसेच शेकडो मित्र परिवाराने आपली उपस्थिती दर्शवून साईंचे आशीर्वाद घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *