श्रद्धा च्या मृत्यू प्रकरणात एक जण पोलिसांच्या ताब्यात

तालुक्यातील पापडा/खुर्द येथील घटना
साकोली- तालुक्यातील पापडा (खु.) येथे गावालगत असलेल्या पोलिस पाटलाच्या शेतातील तणसीच्या ढिगात तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्या ८ वर्षीय  श्रद्धाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. सदर घटना दि.३० रोजी सकाळी उघडकीस आली होती घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती घटनेच्या छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले होते घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतले असून त्याचे नाव अजय पांडुरंग सिडम वय 25 राहणार पापडा असे आहे
सदर तब्येत घेतलेला इसम हा मृतक श्रद्धा च्या चुलत भाऊ आहे पोलिसांनी परिस्थिती ज्यने पुराव्याच्या आधारावर सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करीत आहेत
साकोली तालुक्यातील पापडा (खु.) येथील किशोर सिडाम यांची ८ वर्षीय मुलगी श्रद्धा ही जि.प.प्राथमिक शाळेत तिसर्‍या वर्गात शिकत होती. दि.२८ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम असल्याने शाळेला दुपारी सुट्टी देण्यात आली होती. त्या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता पर्यंत घरी आपल्या बहिणी सोबत होती. त्यानंतर घराशेजारी खेळली व त्यानंतर आपल्या मैत्रिणीकडे अभ्यास करायला जातो म्हणून निघून गेली होती.

रात्री उशिरापर्यंत श्रद्धा घरी परत न आल्याने गावात खळबळ उडाली. याची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पापडा (खु.) येथे जाऊन माहिती जाणून घेतली. पोलिसांनी बेपत्ता श्रद्धा हिचा शोध घेण्याच्या प्रयत्न केला. तिच्या बेपत्ता होण्यामागे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी गावालगतच्या एका शेतात पोलीस पाटील झोडे यांच्या तणसीच्या ढिगार्‍यात एका पोत्यात अर्धवट जळालेले प्रेत दिसून आले. गावात माहिती पसरताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तोबा गर्दी केली होती. याची  माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करुन पे्रत शवविच्छेदनाकरीता नागपूरला पाठविण्यात आले होते. पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करुन घटनेचा छळा लावण्यासंदर्भात पोलिसांना निर्देश देण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *